आला देवा चा देव गणराज

गणराया चा आगमनाला,
ढगांचा आवाज आकाशी झाला,
धरनी नेसली साज,
हिरवा धरनी नेसली साज,
पायी रुनझुन घुंगरू वाद,
आला देवा चा देव गणराज.....

सार विश्व हर्षित,
तुझा करण्या स्वागत,
तू विश्वा चा स्वामी,
तू च त्रिलोक्य नाथ,
तुझा नामाचा जयघोष झाला,
चतुर्थी ला साजे सोहडा,
ढोल ताश्यांचा आवाज,
पायी रुनझुन घुंगरू वाद,
आला देवा चा देव गणराज....

गड़ी मोत्याचा माला,
हाती त्रिशूल तो भाला,
नागबंध कमरे ला,
मूषक वाहन चालला,
उटी शिन्दुरी चंदनी काया,
जास्वन्द आवडे तुझ गणराया,
मुकुट सोन्याचा शोभे साज,
पायी रुनझुन घुंगरू वाद,
आला देवा चा देव गणराज....
श्रेणी
download bhajan lyrics (245 downloads)