परमानंदी तल्लिन व्हावे

परमानंदी  तल्लिन  व्हावे,
गजाननाचे नाम घ्यावे,

भाव फुले ही येतिल बहरुन,
मेघ भक्तिचे येतिल बरसुन,
आनंदाने फुलतिल कण कण,
सुगंध जगी या उधळित जावे ,

जीवन जैसे मृगजळाचे ,
सुख क्षणाचे, दु:ख दिसांचे,
परमभक्ति ही परम सुखाची,
परमात्याला नित्य स्मरावे,

Lyrics and  Music: Shri. Arun Saraf
Singer: Smt. Chandana Deshpande
श्रेणी
download bhajan lyrics (717 downloads)