अंग अंग झाला पांडुरंग

विठल विठल विठल विठला,
पांडू रंग विठला पंडीनाथ विठाला,
विठल विठल विठल विठला,

रंगला अभंग, उधळला भक्तिरंग,
अंग अंग झाला पांडुरंग ॥
टाळ चिपळ्या संगे बोलतो मृदंग,
अंग अंग झाला पांडुरंग ॥

विठूनामाचा लागला छंद,
भाव भक्ति चे लाभले हे पंख,
आनंदे विहरु आम्ही विठू चे विहंग॥
अंग अंग झाला पांडुरंग

ध्यानी मनी आता एकचि आस, एकचि ध्यास,
पंढरीच्या वाटेवर अमुचा प्रवास,
हरी चरणाशी राहू होऊनि नि:संग॥
अंग अंग झाला पांडुरंग


गीत-संगीत-गायन : अरुण सराफ
श्रेणी
download bhajan lyrics (90 downloads)