तोलू नको देवा आता माझे गुण दोष

तोलू नको देवा आता माझे गुण दोष
तूच सर्व गुण देवा, तूच सर्व दोष
तूच माझा अंधार, तूच रे प्रकाश ||

मूकपणा तूची देवा, तूच माझे बोल
बोलसी तू मुखी माझ्या, विठ्ठल विठ्ठल ।। १ ।।

कधी देसी गर्व मना, कधी करीसि  दीन
मज लागी चरणी तुझ्या, होऊ दे विलीन ।।२।।

सुख दु:ख भाव एक, एक घृणा मोह
तुडुंबला भक्तिभाव, आनंदाचा डोह ।।३।

गायक :  रवींद्र साठे
गीत-संगीत : अरुण सराफ
अल्बम : हृदयी रहा रे दयाघना
श्रेणी
download bhajan lyrics (1413 downloads)