आनंदले रंगले दंगले

आनंदले  रंगले दंगले,आनंदले रंगले दंगले ॥
भाव सुमने माळून ,भक्ति चंदने लेपून ॥
रोम रोमातून मी गंधले,
आनंदले  रंगले दंगले......

जिथे ठेविले मस्तक,  तिथे तुझे रे चरण
जिते-तिथे  पाही देवा , तुझे रूप हे लोचन

मूक जाहली रे वाचा,  अश्रु अमृत पिऊन,
हृदयातल्या स्पंदनी, हरी नाम उच्चारण
(श्री राम जय राम , जय जय राम )

ऐसा कृपेचा वर्षाव,  तुडुंबला भक्ति भाव  
अंग अंग अंतरंग ... चिंबले         || १||
       
गीत-संगीत : अरुण सराफ
श्रेणी
download bhajan lyrics (1008 downloads)