तूच सुखकर्ता तूच दुखहरता

तूच सुखकर्ता तूच दुखहरता अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे …॥
चरणी ठेवितो माथा॥

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष, घ्यावा संसाराचा परामर्ष
पुर्या वर्षाची सार्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा॥

बाप्पा मोरया रे …॥
चरणी ठेवितो माथा

नाव काढू नको तान्दुळाचे , केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख सार्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी,द्यावा आशिर्वाद आता ॥
बाप्पा मोरया रे …॥
चरणी ठेवितो माथा

आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणी केळ,सार्या प्रसादाची केली भेळ
गुण गाइन आणी राहीन, द्यावा आशिर्वाद बाप्पा॥

श्रेणी
download bhajan lyrics (1335 downloads)